नामदार पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा
संभाजीनगर /पी सी एन लाईव्ह प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माई विठू नामाच्या गजरात गेली दीड महिना वारकरी संप्रदाय ज्या गोष्टींची वाट बघतो. ती वाट शेवटी आषाढी एकादशीला संपते, असेच मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे नामदार पालकमंत्री तथा खासदार संदिपान भुमरे यांच्या शुभहस्ते विठुरायाची महापूजा करून भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या पंढरपूर या गावी मराठवाड्यातील भाविकांसह परिसरातील परराज्यातील भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायातील अनेक विठ्ठल भक्त या पंढरपुरात नगरीत येतात. ज्या भक्तांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, ते मराठवाड्यातील वारकरी मंडळी आणि विठ्ठल भक्त या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माई च्या दर्शनासाठी येतात, या ठिकाणी शासनातर्फे पालकमंत्री किंवा खासदार हे हे विठ्ठल रुक्माई च्या महापूजेसाठी आवर्जून उपस्थित असतात या वेळेला पालकमंत्र्यांनी खासदार संदिपान भुमरे हेच असल्यामुळे त्यांच्या हस्ते ११.३० वाजेच्या सुमारास महापूजा करण्यात आली यावेळेस त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. यानंतर सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी आणि परिसरातील भाविक भक्तांसाठी मंदिराच्या प्रवेशद्वार खुले करण्यात आले. या महापूजेच्या वेळेस संस्थान चे अध्यक्ष राजेंद्र पवार, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्ण चंद्र शिंदे, गणेश नवले, सचिव अप्पासाहेब झळके, पाटोदा ग्रामपंचायत सरपंच कपिन्द्र पेरे, सुनील मातकर, महेंद्र खोतकर, नितीन साबळे, अक्तर भाई, विष्णू झळके, पांडुरंग नागे, हरीश साबळे, शिवसेनेचे( शिंदे गट ) पश्चिम तालुकाध्यक्ष हनुमंत भोंडवे, उपजिल्हाध्यक्ष दशरथ मुळे, प्रशांत अवचारमल, पोनि जयंत राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे,राजेश पोलीस कर्मचारी सय्यद चांद, योगेश शेळके, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी ३२ पोलीस कर्मचारी ३०० आणि होमगार्ड १५० असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी पाच वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाळुज एमआयडीसी कृष्णचंद्र शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे.