विजेचा वापर केला तर वीज बिल भरावाच लागेल- नितिन राऊत
औरंगाबाद /प्रतिनिधी - लॉकडाऊन मुळे सर्वच क्षेत्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात महावितरणकडून आकारण्यात आलेल्या विजबिलाने तर लोंकांचे कंबरडेच मोडले. त्यामुळे वीजबिल माफ करावे अशी मागणी जोर धरू लागली.मात्र, राज्यात कुणालाही फुकटात वीज मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर कुणी करत असेल तर त्यांना वीजेचं बिल भरावं लागणार आहे. महावितरण काही फुकटात वीज घेत नाही किंवा कंपन्या महावितरणला फुकटात वीज देत नाही. ज्या कंपन्या वीज निर्माण करतात त्यांना कोळसा विकत घ्यावा लागतो, बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा आवश्यक आहे. महावितरणकडे जर पैसेच राहिले नाही तर महावितरन बंद होईल. राज्यात महावितरणने काम केले नाही तर खाजगी कंपन्या येथे येतील. नितीन राऊत पुढे म्हणाले, सरकार वर अनेक संकट आली.वीज थकबाकी मागच्या सरकारने 5 वर्ष बिल दिले नाहीत आणि तेच आपल्या माथ्यावर आलं आहे. मागच्या सरकारची थकबाकी आहे. चांगली वीज बिल वसुली करेल त्याला बक्षीस द्यावे लागेल. महापारेशन आणि महानिर्मिती मी आलो तसं फायद्यात आली आहे.फिडर बंद केले तर शेतकाऱ्यांसोबत महावितरण चे नुकसान होतं, शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर लावले की समस्या मिटेल.