खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक भीषण अपघात
सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ शुक्रवारी (ता. १३) भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.
अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.