गॅस गिझरच्या गळतीमुळे आणखी एक मृत्यू
नाशिक / प्रतिनिधी - नाशिकमध्ये तब्बल पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गॅस गिझरने एका महिलेचा जीव घेतला आहे.एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ महिलेचा गॅस गिझरच्या गळतीमुळे श्वास गुदमररून मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
तब्बल पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गॅस गिझरने एका महिलेचा जीव घेतला. बाथरूममध्ये असलेल्या गॅस गिझरमध्ये गळती होऊन जीव गुदमरल्याने रश्मी पराग गायधनी (वय-49) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रश्मी गायधनी या 49 वर्षाच्या होत्या. त्या एअर इंडियामध्ये ज्येष्ठ वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. 5 फेब्रुवारी सध्याकाळच्या सुमारास बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या रश्मी यांना त्यांच्या कुटुंबीयांनी उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.