जिन्सी  पोलिसांची मोठी कारवाई

जिन्सी  पोलिसांची मोठी कारवाई

औरंगाबाद/ प्रतिनिधी - रविंद्र नगर भागात एका  व्यक्तीस आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास देशी भिंगरी सतरा नावाच्या दारूच्या 78 बॉटल ज्याची किमंत रूपये 4680-/-रूपये  अवैध रीतीने विक्री करताना मुद्देमालासह जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले.
   या बाबत अधिक माहिती अशी की,जिन्सी पोलीस स्टेशन  येथील विशेष गुन्हे तपास पथकाचे पोउपनि गोकुळ ठाकुर हे त्यांच्या स्टफसह पोस्टे जिन्सी हद्दीत पेट्रोलीगं करीत असताना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास एक गुप्तबातमी दाराने खात्रीलायक माहीती दिली की, रविंद्रनगर भागातुन एक इसम मद्याचीअवैध विक्रीसाठी वाहतुक करणार आहे.  माहीती मिळताच पोउपनि गोकुळ ठाकुर यांनी दोन पंच व  स्टाफ च्या मदतीने रविंद्रनगर चौकात सापळा लाऊन थांबलेले असतानां एक इसम रविंद्रनगर चौकालगत गल्लीतुन एक खाकी रंगाचे बॉक्स व एक प्लॉस्टीकची गोणी घेवुन जात असतानां सापडला.  त्याच्या जवळील प्लॉस्टीकची बॅग व खाकी रंगाच्या बॉक्स ची तपासणी करता त्यामध्ये विना परवाना बेकायदेशीर देशी भिंगरी सतरा नावाची दारूच्या 78 बॉटल ज्याची किमंत रूपये 4680-/-रूपये
प्रोव्हीशन गुन्हयातील मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यात घेतले.  चौकशी केली असता त्याचे नाव रामनाथ शंकर गणराज (वय-55 वर्ष) व्यवसाय-मजुरी रा.फुलेनगर पीरबाजार उस्मानपुरा औरंगाबाद असे सांगितले.  त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगीरी  डॉ.निखिल गुप्ता,पोलीस आयुक्त उज्वला बनकर,पोलीस उपआयुक्त परि-2 निशीकांत भुजबळ,सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक  व्यकटेश केंद्रे,विशेष पथकाचे पोउपनि गोकुळ ठाकुर, सहाय्यक फौजदार संपत राठोड,पोलीस नाईक नंदूसिगं परदेशी,सुनिल जाधव पोलीस अमलदार संतोष बमनात यांनी पार पाडली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा