ख्रिस्ती कृती समितीचा  विभागीय आयुक्तलयावर भव्य मोर्चा

ख्रिस्ती कृती समितीचा  विभागीय आयुक्तलयावर भव्य मोर्चा

औरंगाबाद /प्रतिनिधी - गेल्या काही दिवसापासून ख्रिस्त समाजावर अन्यायकारक हल्ले व अत्याचार होत असल्याने समाजातील लोकांमध्ये असुरक्षिततेचि भावना निर्माण झाली आहे. या अन्याय अत्याचाराच्या विरोधात औरंगाबाद शहरात ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने 27 जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत रा. रेव्ह एम यु कसाब यांनी दिली.

पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला ख्रिस्त समाजातील मराठवाडा बिशप धर्मपांत रा .रेव्ह एम  यु कसाब यांनी या विषयी सविस्तर घटना क्रम नमूद करताना सांगितले की,ख्रिस्ती समाज हा साधा सरळ शांत प्रिय व पापभिरू असून हा समाज येशू ख्रिस्त च्या शिकवणी नुसार आणि पवित्र बायबल मधील दिलेल्या नीती मूल्याचा काटेकोर जपणूक करून त्याचे पालन करणारा आहे.

पंरतु आलीकडच्या काळात काही धर्मकंटक जाणीव पूर्वक दुष्ट हेतूने ख्रिस्त समाजाला लक्ष करून प्रार्थना स्थळी तोडफोड करणे, गुरुणा मारहाण करणे महिला व मुलीच्या अंगावर हात टाकणे यासह धार्मिक प्रतिकाची विंटबना करून काही धार्मिक संघटना जाणीवपूर्वक घृणास्पद कृत्य करीत आहेत ,यांच्यावर कुठलीही कायदेशीर कार्यवाही केली जात नाही .

या मुळे ख्रिस्ती धर्मियांच्या मनात मोठी असुरक्षितता व भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.या दुष्कृत्यामुळे भारतीय घटनेतील धर्म स्वातंत्र्य आणि भाषा स्वातंत्र्या सारख्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली जात आहे. या सर्व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी येत्या 27 जानेवारी रोजी ख्रिस्ती कृती समिती वतीने ख्रिस्त समाजातील बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा आमखास मैदानावर निघून विभागीय आयुक्त कार्यलयावर निघणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत मराठवाडा धर्मपांत बिशप  एम यु कसाब यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय निकाळजे ,प्रभूदास आकसाल ,रवींद्र निर्मळ ,प्रवीण बेर्गि ,हतोख देवकते ,अमीत आर्यन,प्रभाकर म्हस्के ,दिलीप शमिंग ,प्रा मनोहर लोंढे ,अनिल खरात ,अभिषेक नाडे ,प्रवीण खतपते ,आदी सह मोठ्या संख्येने ख्रिस्त बांधवांची या वेळी उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन रवींद्र निकम यांनी केले तर विजय निकाळजे यांनी आभार प्रदर्शन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा