संभाजीनगर च्या शाळेत रेड्याचा धुमाकूळ
संभाजीनगर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने घाटी रुग्णालयात दाखल केलंय. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही.
शाळेच्या समोरील रस्त्यावर काही लोकांना रेड्याला मारलं होतं. त्यानंतर रेडा थेट धाव शाळेत शिरला. यावेळी शाळेचा वॉचमनने रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रेड्याला थांबला नाही. रेडा शाळेत घुसला होता तेव्हा, शाळेत जेवणाची सुट्टी झाली होती.
सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानावर खेळत होती. रेड्याच्या धडकेने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. रेडा शाळेत घुसताना आणि विद्यार्थ्यांना धडक देत असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना संभाजीनगर च्या घाटी रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.