डॉ संदीप हंबर्डे यांनी दुर्मीळ शस्त्रक्रिया करत बाळाला दिला पुनर्जन्म
औरंगाबाद / प्रतिनिधी
अतिशय किचकट आणि गुंतागुंत असलेली शस्त्रक्रिया डॉ संदीप हंबर्डे यांनी करून बाळाला पुनर्जन्म दिला असल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे.
अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील कडा येथील रहिवासी सय्यद दगडू पठाण यांना लग्नाच्या अनेक वषार्नंतर पुत्र प्राप्ति झाली. परंतु नियतीला काहीतरी वेगळच मान्य होतं. बाळ झाल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ,बाळाच्या पोटामधील आतडी ही नाभीमागार्तून बाहेर आलेली आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने अहमदनगर गाठले, परंतु नगरला बाळाला कुठल्याच रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही, तेव्हा कड्याचे डॉ.माधव चौधरी यांनी त्यांना औरंगाबाद येथील सिडको नाट्यग्रह च्या बाजूला असलेले रामकृृृष्ण हॉस्पिटलचे बालरोग चिकित्सक व आष्टीचे भूमिपुत्र डॉ संदीप हंबर्डे यांच्याकडे पाठवले. बाळ औरंगाबादला आले तेव्हा अतिशय सिरीयस व क्रिटिकल कंडिशन मध्ये होते ,डॉ. संदीप हंबर्डे यांनी तपासणी करून बाळाला एक्झोम्फॅलॉस मेजर व मालरोटेशन व मेकल्स डायव्हटीर्कूलम परफोरेशन आजार असल्याचे सांगितले, या आजारात जन्मजात बाळाची आतडी हि नाभी मागार्तून बाहेर येतात व आतड्यांना पीळ पडतो , त्यामुळे आतडी काळी पडून आतड्यांना छिद्र पडते व संडास पोटात पसरू लागते. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बाळाचा मृत्यू संभवतो.
डॉ हंबर्डे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली, नंतर नऊ दिवस बाळ काचेमध्ये व कृत्रिम श्वासाच्या मशीनवर होते, प्रयत्नांची पराकाष्ठा करून बाळाला पूर्णपणे बरे केले ,आता बाळ ठणठणीत आहे.
बाळाची शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर उपचार डॉ.हंबर्डे यांनी अतिशय अल्पदरात केली. आष्टी तालुक्यातील सर्व रुग्णांना डॉ. हंबर्डे हे नेहमी तत्परतेने व विनम्रपणे वैद्यकीय अती विशेष उपचारसेवा देतात.
अत्यंत सिरीयस बाळाला नवीन जन्म देऊन त्याला सामान्य आयुष्य बहाल केल्याबद्दल कडा व आष्टी येथील सर्व नागरिकांकडून डॉ हंबर्डे यांचे कौतुक होत आहे.
डॉ हंबर्डे हे आष्टी चे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना आष्टी च्या रुग्णाबद्दल एक वेगळीच आपुलकी आणि आपलेपणा आहे त्यामुळे ते प्रत्येक रुग्णाला न्याय देण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे दिसून येते.