पतीच्या टोमण्याला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

पतीच्या टोमण्याला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय
औरंगाबाद /प्रतिनिधी - आपल्या पतीकडून आपल्याला चांगली वागणूक आणि प्रेम मिळावं, अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. मात्र काहीवेळा पतीकडून प्रेम न मिळता छळ आणि टोमणेच जास्त मिळताच. याला कंटाळून काही महिला घटस्फोटाचा निर्णय घेतात, मात्र काही अशाही असतात, ज्या खचून अतिशय टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. निकिता लखन माळी ( वय 21) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीनंतर याप्रकरणात पती लखन भगवान माळी ( वय 24 ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा. मला दुसरं लग्न करायचं आहे, असं म्हणून लखन निकिता हिला वारंवार त्रास देत होता. या सततच्या त्रासाला निकिता कंटाळली होती. शेवटी तिने अतिशय टोकाचं पाऊल उचललं. या त्रासाला कंटाळुन निकिता हिने मंगळवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निकीताचे वडील इंदास सोनवणे (रा. खरज) यांनी दिलेल्या फिर्यादीत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यावरुन आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा