वर्षानुवर्षे बंद असलेली पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी

वर्षानुवर्षे बंद असलेली पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी

औंगाबाद/ प्रतिनिधी -  सिड़को वाळुज महानगर मधील LIG MIG भागात असलेली पोलीस चौकी गेली अनेक वर्षे बंद असल्यामूळे ती त्वरित सुरू करावी अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी सिडको कर्यालाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिडकोने पोलीस चौकी म्हणून बांधलेली ही सुसज्ज इमारत अक्षरशः वर्षानुवर्षे धुळ खात पडून आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा पोलीस चौकी बांधण्यात आली त्यानंतर काही दिवस या ठिकाणी पोलीस अधिकारी / कर्मचारी नियमित येत असत व पोलीस चौकी सुरु होती. परंतु काही दिवसांनी मात्र या ठिकाणी पोलिसांचे येणे बंद झाले व पोलीस चौकी अचानक बंद झाली.सिडकोची सुसज्ज इमारत असुनही पोलीस चौकी बंद होण्याचे कारण  नागरिकांना अद्याप समजलेले नाही. या गोष्टीला जवळपास ४ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. तेव्हाची सुसज्ज असलेली ही वास्तु आज एखाद्या सिनेमातील भुतबंगल्याप्रमाणे बेवारस पडून असल्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी रिकामटेकड्या लोकांचा वावर वाढत चालला आहे. तसेच सिडको व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन या इमारतीचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी व सर्वसामान्यांना या पोलीस चौकीचा आधार वाटण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार होत आहे. वाढलेली लोकसंख्या व नागरिकांमधुन वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन सदरील इमारतीचे नुतनीकरण करत सुसज्ज पोलीस चौकी सूरू करावी. अशी विनंती निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा