महाराष्ट्र शिक्षक परिषेदेची विभाग बैठक संपन्न बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मराठवाडा विभाग बैठक औरंगाबाद सिडकोतील धर्मवीर संभाजी विद्दालय येथे दि. 28 नोव्हेंबर रोजी पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार झरिकर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांतचे माजी सदभाव प्रमुख वामनराव देशपांडे, विभाग कार्यवाह सुरेश पठाडे,विभाग कोषाध्यक्ष विजय होपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातीलऔरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड, बीड,उस्मानाबाद, लातूर या 8 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष, विभाग कार्यकारिणी पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत मागील बैठकीतील ठराव वाचन, सर्व जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला,नवीन नियुक्त्या,शिक्षकांना येणाऱ्या अडचणी,जुनी पेन्शन योजना,नवीन सदस्य नोंदणी,नवीन जिल्हा, तालुका अध्यक्ष पुनर्रचना,SC, ST VJNT, शाळा इत्यादी आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन, भत्ते,सेवांतर्गत प्रशिक्षण 2000/ शुल्क मागणी इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी अर्जुन दांडगे, सोमनाथ मेटे, नानभाऊ खैरनार, सुधाकर घायताडक, रामदास कुलकर्णी, गणेश पवार, प्रशांत मेरत, विजय फरकाडे, काका जाधव, बळीराम मुरमे, रामदास निळ, मधुकर कुलकर्णी, गोविंद कवळे, जी एच लद्दाफ, मधुकर उन्हाळे, विशाल शिंदे, बाबुराव पारसकर, संग्राम तरडे, तुळजादास देशपांडे, मच्छिंद्र गुरमे, सत्यप्रकाश नांदापूरकर, कल्याण औटे, जे जी गायकवाड, डी सी डुकरे, मुंजाजी गोरे, डॉ अनिल मैड, उमाकांत कुलकर्णी, उत्तम केंद्रे, राजेंद्र खेडकर, संजय खेडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन औरंगाबाद जिल्ह्याध्यक्ष अनिल घायवट यांनी केले तर आभार औरंगाबाद महानगर कार्यवाह श्रीराम बोचरे सर यांनी मानले