औरंगाबादेत दोन उद्योजकावर ईडी च्या धाडी
औरंगाबाद/प्रतिनिधी
देशभरात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयच्या कारवाईचे सत्र सुरू असताना गुरुवारी दि.११ ईडीने औरंगाबादेत दोन उद्योजकांच्याा सात कार्यालयावर आणि घरांवर छापे टाकले. कारवाईत महत्वाचे हिशोब, आर्थिक व्यवहाराची तपासणी व महत्वातची कागदपत्र, बँकेच्या व्यवहाराची तपसाणी करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात येत होती. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली असून उद्योजक आणि बिल्डर धास्तातवले आहेत.
जालना रोड, पैठण रोडवरील कंपनी, घर, कार्यालय अशा सात ठिकाणी ईडीच्या शहरात दाखल झालेल्या दोन पथकातील सदस्यांनी एकाचवेळी छापे टाकून कागदपत्रांची झाडाझडती घेतली. ईडीच्या ४० ते ४५ अधिकाऱ्यांची टीम औरंगाबादेत दाखल झाली आहे. त्यातील एक पथक बुधवारी रात्रीच शहरात दाखल झाले तर गुरुवारी सकाळी विमानातून एक पथक आले होते. कारवाईच्या एक दिवस आधी आलेल्या पथकाने रात्रीच दोन्ही उद्योजकांच्या कार्यालयाची माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा ते सात वाहनांनी अधिकारी त्यााठीकाणी आले आणि एकाच वेळी दोघांच्या कार्यालयावर धाडी टाकल्या. शिपायी आणि अन्य लोक वगळता कोणालाही कार्यालयातून आत-बाहेर येण्या मज्जाव करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती.
दोन्ही उद्योजक परस्परांशी संबंधित असून त्यांच्या औरंगाबादसह जालन्यातही मालमत्ता असल्याचे समजते. एका उद्योजकाने अलिकडेच नवी कोट्यवधी रुपये किमतीची कार घेतलेली असून दुसरा उद्योजक हा राज्यातील सत्तेतील एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या खास वर्तुळातला असल्याचीही माहिती आहे. गुरुवारी दिवसभर जालना रोडवरील जिल्हा न्यायालया नजीकच्या परिसरातील संस्था, कार्यालयांवर ईडीचे पथक कागदपत्रांची झाडाझडती घेत होते. यामध्ये परदेशी चलन व्यंवस्थापन कायदा (फेमा), मनी लाँड्रींगच्या आधारे किंवा आणखी कोणत्या कारणामुळे ही कारवाई होत आहे, याची माहिती समजु शकली नाही. याबाबत अधिकार्यांशी बोलण्यााचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नेमका तपशील समजु शकला नाही. ईडीला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर हे धाडसत्र सुरू आहे.
कारवाईची माहिती ईडी व्टीटव्दारे देत असते, मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतेही व्टीेट इडीच्या् अधिकृत व्टिटर हॅन्डीलवरुन आलेले नाही. दोन्हीा उद्योजकांशी संबंधीत जेवढी कार्यालय आहेत, त्या ठीकाणी देखील कारवाई सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यातील बिल्डर याच्यावर दुसऱ्यांदा धाडी पडत असल्याचे माहिती समोर येत आहे.