रिपब्लिकन सेनेचे अनोखे आंदोलन शहरातील ड्रेनेज व रस्त्यावरील खड्ड्यांना महापालिका आयुक्तांचे नाव

औरंगाबाद /प्रतिनिधी - आजपर्यंत आपण विविध प्रकारची आंदोलने बघितली असतील परंतु रिपब्लिकन सेनेने शहरातील रस्त्यावरील उघड्या ड्रेनेज व खड्ड्यांना महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांचे नाव देत  एक वेगळ्याच पद्धतीचे आंदोलन केले. आज टाऊन हॉल येथे हे आंदोलन पार पडले.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.कोरोना महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्री हे नागरिकांना स्वच्छ्ता ठेवण्यासाठी आवाहन करत आहे.असे असताना शाक्य नगर,भोईवाडा येथील ड्रेनेज लाईन बंद झाली असून पाणी नागरिकांच्या घरात जात आहे.यामुळे परिसरातील नागरिक बालके आजारी पडत आहे.यासंदर्भात रिपब्लिकन सेनेच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करून देखील महापालिका प्रशासक अस्तीक  कुमार पांडे दखल घेत नाही. त्यामुळे खाम नदीला आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून  देण्यात आलेली राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या नावाच्या संकल्पनेला प्रेरित होऊन परिसरातील खड्डे, ड्रेणेज लाईनला पालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांचे नाव देण्यात आले.यावेळी चंद्रकांत रूपेकर, आनंद कस्तुरे, काकासाहेब गायकवड,सिद्दोधन मोरे, सचिन निकम, मनीषा साळुंके, राहुल कानडे, बबन साठे, विकास हिवराळे, रामराव नरवडे, धम्मा भुजबळ, सचिन शिंगरे,विलास गायकवाड, अतुल कांबळे, अफसर भाई, शालिनी बनसोडे, सुनीता बनसोडे, सुमन बनसोडे, अजय बनसोडे, शेषराव दाने, राजाबाबु बनसोडे, कुणाल तुपे, विजेंद्र बनसोडे, नरेंद्र बनसोडे उपस्थित होते.


देण्यात आलेली नावे
आस्तिक कुमार पाण्डेय खड्डे युक्त मार्ग, आस्तिक कुमार फुटलेले सुंदर ड्रेनेज,  पाण्डेय सुंदर कचरा डेपो खड्डे युक्त रस्ते, फुटलेले द्रेनेज, साचलेला कचरा, पाच दिवस आड पाणी आस्तिक कुमार पाण्डेय स्मार्ट सिटी अशी नावे ड्रेनेज व खड्ड्याना देण्यात आली होती.

प्रत्येक झोपडपट्टी भागात अशीच अवस्था
शहरात अनेक वसाहतींमध्ये ड्रेनेज फुटून दूषित पाणी  नागरिकांच्या घरात शिरत असल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने खाम नदीच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर टाऊन हॉल येथील ड्रेनेज, खड्यांच नामकरण करत पालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांचं नाव दिलं आहे.यावेळी महापालिका आयुक्त विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 गेल्या वर्षभरापासून वारंवार मागणी  करून देखील कोणीही लक्ष देत नाही.परिसरातील नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात मागणी मान्य न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनातील शौचालय सार्वजनिक करून नागरिकांना शौचालय खुल करणार असे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा