परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती त्वरीत कळवा
औरंगाबाद / प्रतिनिधी - कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमीक्रोन हा अतिशय घातक असून तो खूप वेगाने पसरतो त्यामुळे तो पसरू नये यासाठी देशपातळीवर काटेकोर नियमांचे पालन केले जात आहे.
महाराष्ट्रात ओमीक्रोन चा एक रूग्ण आढळून आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे़ त्यादृष्टीकोनातून मागील 15 दिवसात किंवा दि़15 नोव्हेंबर नंतर परदेशातून औरंगाबाद शहरात जे व्यक्ती आले आहेत त्यांची इत्यंभूत माहिती (नाव,वय,पत्ता,मो. न.)त्वरीत कोरोना वॉर रूम हेल्प लाईन क्र 8956306007 वर किंवा coronaabdamc@gmail या मेलवर कळवावी़ जेणेकरून परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत योग्य त्या उपाययोजना करणे वेळेतच शक्य होईल असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ़ पारसमंडलेचा यांनी नागरिकांना केले आहे.