राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू

राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू

औरंगाबाद/ प्रतिनिधी - कोरणा रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध सर्व नागरिकांसाठी लागू असून त्याचे पालन करणे अनिवार्य आहे असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

   सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल, खुल्या जागेत ती २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ती राहील.
    उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच खुल्या जागेसह जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.
   क्रीडा स्पर्धा, खेळाच्या समारंभासाठीच्या स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा