कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती वर शिवशाही शेतकरी विकास पँनलचे निर्विवाद वर्चस्व

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती वर शिवशाही शेतकरी विकास पँनलचे निर्विवाद वर्चस्व

कन्नड /प्रतिनिधी - कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा शनिवारी निकाल लागला. या निकालात शिवसेना (शिंदे) जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांच्या शिवशाही शेतकरी विकास पँनलने १८ पैकी १६ जागेवर मोठ्या फरकाने विजय मिळवत बाजार समातीवर निर्विवाद वर्जस्व राखले आहे.

तर माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देऊन भाजपला एक जागा खेचून आणत विजय मिळाला.  माजी सभापती प्रकाश घुले यांचा अल्प मताने पराभव झाला. तर हमाल- मापारी मतदारसंघावर मात्र शेख युसुफ शेख मुनीर या अपक्ष उमेदवारांनी आपला झेंडा रोवला.

उद्धव ठाकरे सेनेचे आमदार उदयसिंह राजपुत यांच्या पँनलला दारुण पराभव पत्कारावा लागला. बाजार समितीच्या ३ हजार २० मतदारापैकी २ हजार ९०३ मतदारांनी मतदान केले होते यात ६७७ मतदान अवैध झाले यामुळे अनेक विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांचा पराभवास कारणीभूत ठरले.

विजयी झालेले उमेदवार

सहकारी संस्था - (सर्वसाधारण)
साईनाथ रंगनाथ आल्हाड (६०३)
कैलास माणिकराव अकोलकर (५४५)
युवराज एकनाथ चव्हाण ( ४९६)
देविदास संपतराव मनगटे (४७४)
शिवाजी रंगनाथ थोरात (४४६)
गोकुळसिंग तोताराम राजपुत (४२१)
किशोर नारायणराव पवार (४१४)
सहकारी संस्था - (महिला राखीव)
सुलोचना बाई भगवंतराव पवार ( ४९०)
अनिता राजेंद्र शेलार ( ५१७)
सहकारी संस्था - (इतर मागासवर्गीय )
कांताराम अंबादास सोनवणे ( ५५३)
सहकारी संस्था - (विमुक्त जाती भटक्या जमाती )
मनोज महारु राठोड ( ५३२)
ग्रामपंचायत - (सर्वसाधारण )
चंद्रभान भागीनाथ गोरे (४३६)
बाळासाहेब राऊबा जाधव ( ४९४)
ग्रामपंचायत - (आर्थिक दुर्बल घटक)

जयेश काकासाहेब बोरसे ( ५८८)
ग्रामपंचायत - (अनुसूचित जाती ,जमाती)
दिलीप दयानंद बनकर (५३३)
व्यापारी मतदारसंघ -
प्रकाश पुनमचंद अग्रवाल - (११९)
अब्दुल जावेद अब्दुल वाहेद (९६ )
हमाल - तोलारी मतदारसंघ-
शेख युसुफ शेख मुनीर. (१७४)

नागद येथे केळी तर औराळा येथे कांदा मार्केट

बाजार समितीत आमच्या पँनलला मतदारांनी चांगले यश दिले आहे. येणाऱ्या काळात या बाजार समितीत शेतकऱ्यांना चांगल्या सुख सुविधा देण्यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न असणार आहे. आणि विशेष 365 दिवस मका या पिकाचे मार्केट चालू करणार यासह भविष्यात नक्कीच आमची माणसे मागची राहिलेली काम पूर्ण करतील असा विश्वास आहे. नागद येथे केळी मार्केट, औराळा येथे कांदा मार्केट सुरु करण्याचा एक मानस आहे असे कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील म्हणाले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा