ऋतुचर्या दिनचर्या आहार आणि विहार हे जगण्याचे चार स्तंभ - डाॅ रोहिणी काचोळे

ऋतुचर्या दिनचर्या आहार  आणि  विहार हे  जगण्याचे चार स्तंभ  - डाॅ रोहिणी  काचोळे

औरंगाबाद / प्रतिनिधी - अक्षय डेंटल हॉस्पिटल व जागृतीमंच  यांच्या  संयुक्त  विद्यमाने  मोफत  दंतशिबिर  आयोजित करण्यात  आले  होते. यानिमित्त  डाॅ. रोहिणी  काचोळे  यांनी " आपले आरोग्य  ,आपली  शिस्त "या  विषयावर  महिलांशी  संवाद  साधला. ऋतुचर्या, दिनचर्या, आहार  आणि  विहार हे  चार  स्तंभ  जगण्याचे  आहेत  आणि  यावरच  आपल जीवन  सफल होईल  असे त्यांनी  या प्रसंगी सांगितले. 

प्रत्येक  ऋतूत  जे  फळ येतात, भाजी पाला  उपलब्ध  असतो  तो  आपल्या आहारात  असेल  तर  शारीरिक  व  मानसिक  स्वास्थ्य  उत्तम  रहात. आपल्या आहारावर  आपली  संस्कृती अवलंबून  आहे. आणि  आपल्या  देशाची  ओळख  आहार  पध्दतीवर  आहे. आज  लवकर  झोपणे  व  लवकर  उठणे  कालबाह्य  झाले  आहे, पण  पुढच्या पिढीला  हा नियम  घालून  देणे  गरजेचे  आहे, लवकर  उठल्यामुळे बुध्दी  तल्लख  रहाते, आणि  दिनचर्या  आंनददायी  बनते. डोक  दुखणे, पित्त  वाढणे, मळमळ  होणे, हे  सगळे  प्रकार  दूर  करायचे  असतील  तर  प्रत्येकाने  लवकर  उठणे  आवश्यक आहे. त्यामुळेच पोट  साफ  रहात. भूक  लागल्यावर  जेवण  करा म्हणजे  आहाररस  तयार  होतो आणि  माणसाला  जेवण  जात. जेवण  करताना  मन  व  बुद्धी शांत  ठेवावी. यामुळे  आपण   उत्तम  कष्ट  करू शकतो. आपल  सौंदर्य जोपासायचे  असेल  तर  सनस्क्रीन, इतर  क्रीम  लावुन  चालणार  नाही  तर  यासोबत  उत्तम  आहाराची  शिस्त  आपणाला  लावावी  लागणार  आहे, आणि  याची  जबाबदारी  प्रत्येक  घरच्या  आईवर  आहे, चुकीचा आहार, चुकीचे  नकारात्मक  विचार  आणि  चुकीची  झोपेची  वेळ  हे  टाळल  तर  आपल्या आरोग्याला  नक्कीच  शिस्त  लागेल, असे  मत  डाॅ, रोहिणी  काचोळे  यांनी  व्यक्त  केले. 
या कार्यक्रमात  चाळीस  जणांची मोफत  दंत तपासनी करण्यात आली. जागृतीमंच  च्या सर सर्व  सदस्या  या कार्यक्रमाला  उपस्थित  होत्या. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  भारती भांडेकर बिस्वास  यांनी  केले,तर  स्वागत  अंजली  कुलकर्णी व  योगिता  बेंडसुरे  यांनी  केले. कार्यक्रमाचे  सर्व  नियोजन  डाॅ  सुषमा  सोनी  यांनी  केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा