शहर  होणार धूळ मुक्त महानगरपालिकेतर्फे 24x7 यंत्रणा कार्यान्वित

शहर  होणार धूळ मुक्त महानगरपालिकेतर्फे 24x7 यंत्रणा कार्यान्वित

औरंगाबाद/ प्रतिनिधी- औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा (Construction and Demolition Waste (C &D) उचलण्यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वीत करणेसाठी आदेश दिले आहेत. यानुसार मनपा यांत्रिकी विभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात अधिकृतपणे वरील कामासाठीच्या नगररचना विभागामार्फत शुल्काचा भरणा करून नवीन इमारत तयार होत असताना निर्माण झालेले वेस्टेज बांधकाम साहित्य त्याचप्रमाणे अनाधिकृतपणे शहरातील रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी टाकण्यात आलेले डेब्रिज ,रोडारोडी,वेस्टेज बांधकाम साहित्य उचलून नेमून दिलेल्या ठिकाणी टाकण्याचे काम सातत्याने 24 x7 तत्वावर होणार आहे.यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, वाहने,वाहन चालक,वर्कशॉप व पंक्चर युनिट कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

कंट्रोल रूम: कंट्रोल रूम संपर्क क्र.8551058080

यांत्रिकी कार्यशाळेत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. वर नमूद क्रमांक हा कंट्रोल रूम चा असेल व यासाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगररचना विभागामार्फत अधिकृत बांधकाम परवानगी देताना C&D शुल्क भरणा करून प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगीच्या ठिकाणी निर्माण होणारे वेस्टेज बांधकाम साहित्य उचलण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृतपणे टाकण्यात आलेले डेब्रिज, रोडारोडी,वेस्टेज बांधकाम साहित्य याबाबत महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक,स्वछता निरीक्षक, जवान, अथवा शहरातील नागरिक यांचेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन तक्रारींचे ठिकाण,तक्रारदाराचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून तक्रार संबंधित वाहन चालक यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. नागरिक वर नमूद हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवू शकतात.यासाठी  दोन जेसीबी व चार टिप्पर 24x7  C &D उचलण्यासाठी सकाळी 6.00 ते साय 6.00 व साय 6.00 ते सकाळी 6.00 या दोन शिफ्ट मध्ये कार्यरत राहणार आहेत.

छोट्या गल्लीतील डेब्रिज उचलण्यासाठी चार मेगा हॉपर

प्रशासक यांच्या आदेशानुसार याकामी नियुक्त वाहनांना नेव्ही ब्लु व गडद पिवळा असे दोन पट्ट्यात रंग देण्यात येणार आहेत. सदरील वाहने C & D  मोहिमेविषयी अन्यत्र कोणत्याही कामासाठी वापरले जाणार नाही .कंट्रोल रूम कडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन तासांचे आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक असून याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सदर वाहने 24x7  तत्वावर कार्यरत असणार आहेत.याकामी कार्यरत असलेल्या वाहनांना काही बिघाड झाल्यास स्तवर दुरुस्तीसाठी दोन शिफ्ट मध्ये प्रत्येक महिन्याच्या दि 1 ते 15 पथक क्र 01 सकाळ शिफ्ट मध्ये तर दि 16 ते 30/31 दुसऱ्या पाळीत काम करेल.
 सदरील कार्यरत वाहने पंक्चर दुरुस्ती संदर्भाने पंक्चर युनिट पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता डी के पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  यांत्रिकी विभाग अधिकारी ,कर्मचारी याकामी कार्यरत असणार आहेत अशी माहिती उप अभियंता (यांत्रिकी) यांनी दिली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा