ट्रॅक्टरला पिकपची धडक

ट्रॅक्टरला पिकपची धडक

बीड/ प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन सवळेश्वर रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपची धडक लागून झालेल्या भीषण अपघातांमध्ये राक्षसभुवन येथील बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 रात्री साडेअकराच्या दरम्यान हा अपघात झाला असून उसाची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच ट्रॅक्टरला चंद्रशेखर यांच्या पिकअपने जोराची धडक दिली आणि यामध्येच चंद्रशेखर पाठक (वय वर्ष 39) आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आर्यन पाठक याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पाठक यांची मुलगी मंजिरी (वय वर्ष 11) ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही पिकअप मधून प्रवास करत होते.

चंद्रशेखर पाठक त्यांचा मुलगा आर्यन आणि मुलगी मंजिरीसह अन्य दोघेजण हे चंद्रशेखर यांच्या मालकीच्या असलेल्या पिकअपमधून रात्री अकराच्या सुमारास शहागडवरून राक्षसभुवनच्या दिशेनं येत होते. सावळेश्वर जवळ ऊस भरण्यासाठी एक ट्रॅक्टर उभा होता. आणि या ट्रॅक्टरला या पिकपची पाठीमागून जोरात धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, पिकपच्या समोरच्या बाजूचा पूर्ण चुराडा झाला आहे. अपघातानंतर ऊस भरणाऱ्या मजुरांनी त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तोपर्येंत बाप लेकाचा मृत्यू झाला होता आणि अकरा वर्षाची मंजिरी गंभीर जखमी झाल्यानं तिला आणि अन्य दोघांना बीडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

चंद्रशेखर पाठक हे भिक्षुकी होते. राक्षसभुवन गावामध्ये दशक्रिया विधी आणि अन्य पूजापाठ करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे दोन मुलं पत्नी आणि आई असा त्यांचा परिवार होता. मात्र रात्री काळानं अचानक घाला घातला आणि यामध्ये कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राक्षसभुवन गावावर शोककळा पसरली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा