गरुडझेप परिवाराच्या यशात आणखी एक मानाचा तुरा

गरुडझेप परिवाराच्या यशात आणखी एक मानाचा तुरा

वाळूज महानगर/प्रतिनिधी - 16 व्या नॅशनल चॅम्पियनशीप सिरहिंद, जिल्हा फतेहगढ साहिब (राज्य-पंजाब) येथे झालेल्या स्पर्धेत गरुडझेप परिवाराच्या चार कन्यांनी जिंकले गोल्ड मेडल. 
  गरुडझेप स्पोर्ट अकॅडमी औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील विद्यार्थ्यांना 16 व्या नॅशनल चॅम्पियनशीप सिरहिंद, जिल्हा फतेहगढ साहिब (राज्य-पंजाब) येथे झालेल्या स्पर्धेत ईश्वरी निलेश सोनवणे  हिने 44 kg (कॅडेट) वजन गटात गोल्ड मेडल मिळवले, किंजल निलेश सोनवणे हिने 24kg (सब ज्युनियर) गटात  गोल्ड मेडल मिळवले, समीक्षा सुरेश सोनवणे हिने 22 kg (सब ज्युनियर)गटात गोल्ड मेडल मिळवले तर आराध्या गणेश सोनवणे हिने 26 kg(सब ज्युनियर) गटात गोल्ड मेडल मेडल मिळवले यां स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत एकूण 5 विध्यार्थी गेले होते त्यातील चार मेडल एकाच परिवारातील बहिणींनी पटकावले,तसेच वेदांत अजित जैन याने 26 kg (सब ज्युनियर) गटात कास्य पदक मिळवले एकाच परिवारात ४  गोल्ड मेडल मिळविणे हि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळे गरुडझेप परिवाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्व स्तरातून या ४ ही  विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.   
यांना गरुडझेप स्पोर्ट्स क्लब चे संतोष बसनेत व सुनील बसनेत सर  यांनी मार्गदर्शन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा