एम. सी .व्ही.सी. शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण होणार
औरंगाबाद /प्रतिनिधी - राज्यातील एच. एस .सी. होकेशनल एमसीव्हीसी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षक मागील दहा ते बारा वर्षापासून वरिष्ठ वेतन श्रेणी च्या प्रतीक्षेत आहेत. परंतु शासनाने मागील दहा ते बारा वर्षापासून वरिष्ठ वेतन श्रेणी करिता सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर एमसीवीसी चे शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी पासून वंचित आहे . या शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण न झाल्यामुळे त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी शासनाने दिलेली नाही त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे .यासाठी महाराष्ट्र वोकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ.मनोहर वानखडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
आज सहसंचालक एस. आर .सूर्यवंशी ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण औरंगाबाद यांना डॉ. मनोहर वानखडे, प्रा .रामदास गायकवाड ,प्रा. भीमसिंग राजपूत ,प्रा लियाकत अली, प्रा.जयस्वाल ,यांनी निवेदन देऊन मागण्यांवर सविस्तर चर्चा केली असता मराठवाडा विभागातील शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यात यावे असे ठणकावून सांगितले असता सहसंचालक, एस. आर . सूर्यवंशी यांनी सदरील मागणीची तात्काळ दखल घेऊन, महसूल प्रबोधनी औरंगाबाद मार्फत मराठवाडा विभागातील इंग्रजी व हिंदी ,मराठी या शिक्षकांचे ताबडतोब दोन ते चार दिवसांमध्ये सेवांतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण घेण्याचे निश्चित केले आहे.
तसेच इतर विषयांचे सुद्धा प्रशिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम यावर सुद्धा लवकरात लवकर देण्यात येणार आहे. व डी.सी.पी.एस .रकमेच्या पावत्या ताबडतोब शिक्षकांना देण्याचे आदेश सहसंचालकांनी दिले आहेत. सूर्यवंशी यांनी सर्व मागण्या मान्य करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.