किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये हाणामारी व्हिडिओ व्हायरल

परभणी /प्रतिनिधी -किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परभणीतील दर्गा रोड परिसरातील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. परंतु तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यामुळं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. त्यानंतर दर्गा रोडवर तरुणांचे दोन गट आमने-सामने आले आणि मारामारी सुरू झाली


 या घटनेचा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता तरुणांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडल्यानं शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील दर्गा रोड परिसरातील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. परंतु तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यामुळं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. त्यानंतर दर्गा रोडवर तरुणांचे दोन गट आमने-सामने आले आणि मारामारी सुरू झाली. नेमकं कोण कुणाला मारतंय हे समजत नसताना अनेकांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या हाणामारीच्या प्रकरणात शहर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा