देशी दारू तस्करी करणाऱ्यास रंगेहात पकडले

देशी दारू तस्करी करणाऱ्यास रंगेहात पकडले

पैठण/ प्रतिनिधी -   पैठण औरंगाबाद रोडवर दि. २० जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास एमआईडीसी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर 132 केव्ही सब स्टेशन समोर एका संशयित अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी च्या पथकाने शिताफीने पकडले.

   यावेळी त्याच्याकडे ताब्यातून अवैध देशी दारू चे पाच बॉक्स सापडले. बॉक्स ची तपासणी केली असता त्यात 24 हजार रुपये किमतीच्या 240 सील बंद देशी दारूच्या बाटल्या   तसेच एक मोटरसायकल असा 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  आरोपी योगेश सुर्वे (रा. ईसारवाडी) यास पोलिसांनी अटक केली. सदर कारवाई ही स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नेहुल पाटिल सर सह पथकातील पोना. सचिन भूमे, पोना. अरुण जाधव, पोका. गणपत भवर, अमोल सोनवणे यांनी पार पाडली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा