माॅन्टेसोरी बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
औरंगाबाद / प्रतिनिधी - दोन वर्ष कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवला होत्या. केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरू असलेल्या शाळा आता प्रत्यक्ष सुरू झाल्या आहे. बुधवार १५ जून रोजी औरंगपुरा येथील आ. कृ. वाघमारे प्रशाळा, माॅन्टेसोरी बालक मंदिर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेचा पहिला दिवस असल्याने संस्थेच्या वतीने पुस्तके, चॉकलेट, पुष्पगुच्छ देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकवर्गाची मोठया संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात संस्थचे अध्यक्ष डॉ. रमेश मालाणी, सचिव माजी नगरसेवक प्रफुल्ल मालाणी, सदस्य गिरमे, गादिया, सोनी, प्रमुख अतिथी विधानसभा संघटक माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, माजी नगरसेवक सचिन खैरे, मध्यमिक मुख्याध्यापक डी. डी. लांडगे, प्राथमिक मुख्याध्यापक के. एम. देशमुखे यांची उपस्थिती होती.शाळा प्रवेशोत्सव, मोफत पाठपुस्तके वितरण कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.