राजश्री उंबरे यांची प्रकृती खालावली लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज

राजश्री उंबरे यांची प्रकृती खालावली लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज

संभाजीनगर / प्रतिनिधी : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी क्रांतीचौकात उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी १० दिवस होता. त्यांची राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी भेट घेतली.
त्यांच्याशी चर्चा करून पाणी देत उपोषण सोडण्याचे विनंती केली.

यावेळी सावे म्हणाले की,लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेऊ, तसेच चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळाने मुंबईमध्ये बैठकीसाठी येण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे, या व इतर २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील यांनी २ तारखेपासून क्रांतीचौक येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा १० दिवस होता. यावेळी मंत्री सावे यांच्यासह किशोर चव्हाण, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष काळे, शैलेश भिसे यांच्यासह प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा