पतीनेच केली पत्नीची गळा चिरुन हत्या
पुणे /प्रतिनिधी - पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पत्नीचा खून केल्यानंतर पती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडत बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात चाकण जवळील मेदनकरवाडी येथे हत्येची घटना घडल्याचं समोर आलं आहे.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती सातारा येथे पळून जात होता. त्यावेळी चाकण पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं. सचिन रंगनाथ काळेल असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. त्याने 23 वर्षीय पत्नी अश्विनी सचिन काळेल हिची हत्या केल्याचा आरोप आहे. चारित्र्यावर संशय घेऊन सचिनने तिला जीवे मारल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी पतीला गजाआड केलं.
काय आहे प्रकरण?
पत्नीची गळा चिरुन हत्या केल्या प्रकरणी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खून केल्यानंतर पती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. पुणे जिल्ह्यात चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.