चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

मुंबई / प्रतिनिधी - चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू झाला.  मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. वांद्रे येथून निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला येत असताना हा अपघात घडला. बोरिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून त्यामध्ये रेल्वे कर्मचारी ट्रेनमधून पडतानाचा अंगावर काटा आणणारा क्षण कैद झाला आहे.

 घटना कशी घडली

धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना रेल्वे कर्मचाऱ्यालाच प्राण गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावरुन निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवलीला आली. बोरिवली येथे आल्यानंतर ते चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा हात ट्रेनच्या दांड्यावरुन सुटला नाही. त्यामुळे ते ट्रेनला धडकले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावर संबंधित कर्मचारी ट्रेनमधून उतरत असताना पडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रेल्वेच्या आवाहनाकडे प्रवाशांचं दुर्लक्ष

रेल्वे पोलीस प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा चालत्या ट्रेनमधून खाली उतरु नका, असं आवाहन वारंवार करत असतात. चालत्या ट्रेनमधून चढणे आणि उतरणे जीवघेणे ठरु शकते. गेल्या काही दिवसात अशाप्रकारे अनेक अपघात घडल्याचं पाहायला मिळत आहे.

काही वेळा प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले रेल्वे पोलीस किंव सहप्रवासी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत असल्याचंही पाहायला मिळतं. पण प्रत्येक वेळी प्रत्येकाला योग्य ती मदत मिळेलच, तुम्ही नशीबवान असालच, असं नाही.

वेगात असलेल्या गाडीत चढता-उतरताना काही जण हलगर्जी करतात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो. रेल्वेप्रमाणेच आम्ही तुम्हालाही आवाहन करु इच्छितो की, कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करु नका.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा