मनपाने राबवली धडक मोहीम

औरंगाबाद प्रतिनिधी- मनपा आरोग्य(मलेरिया) विभागाच्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू,साथरोगा पासून बचाव करिता शहरात साथ रोग प्रतिबंधक उपाय म्हणून धडक मोहीम राबविली जात आहे,या अनुषंगाने गुरुवारी 23 सप्टेंबर रोजी मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मांडलेचा याचा उपस्थितीत सातारा देवळई परिसरात मनपा आरोग्य विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून  शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून  बुहतांश सखोल व  स्लम भागात पाणी  तुंबल्यामुळे  मोठ्या प्रमाणावर डेंगू साथरोग चा फैलाव  होत आहे. यामुळे मनपा  आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार,मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी आज  झोंन क्र 8 सातारा देवळाई येथे स्वतः महिमेत सहभागी होऊन धडक मोहीम राबवली,या वेळी मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक शेख अन्वर यांनी परिसरात मोहिमे बाबत माहिती देताना गप्पी मासे रामकृष्ण आश्रमात कसे तयार केले जातात ते दाखवले.



यानंतर वॉर्डात मोहिमेला सुरवात करण्यात आली यामध्ये किटकनाशक, औषध फ़वारणी,घरोघरी जाऊन ऑबेटीग,धुर फवारणी,स्टीकर चिटकवने,हस्तपत्रीका वाटप,करून जनजागृती, डास अळी निर्मिती स्थान नष्ट करणे, पावसाचे साचलेले पाणी खाली करून औषध फवारणी व पाण्यात गप्पी मासे टाकणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला होता.
 या मोहीमेत 104 फवारणी कर्मचारी सहभागी झाले होते अशी माहिती मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक शेख अन्वर यांनी दिली.  डाॅ पारस मंडलेचा यांनी स्वतः वार्ड मध्ये फिरून लोकांना डेंग्यु,चिकनगुनिया या साथ रोगांची माहिती दिली. या प्रसंगी बीड बायपास रोड वरील श्रीरामकृष्ण मिशन आश्रम यांच्या वतीने स्वामी विष्णूपादानंद महाराज,स्वामी चेतन आत्मानंद महाराज यानी डाॅ पारस मंडलेचा यांचा सत्कार केला.  यावेळी मागील 2 वर्षापासून कोरोंना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना झोंन क्र 8 चे पर्यवेक्षक शेख अन्वर यांच्या तर्फ कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा,माजी महापौर नंदकुमार घोडेले,जीवशास्त्रज्ञ डाॅ अर्चना राणे,डाॅ बाबासाहेब उनवने विलास बगदाणे,के.बी.मोरे पर्यवेक्षक शेख अन्वर,दिलीप राठोड गणेश शिदे, राहुल चव्हाण औचित मोरे,चुन्नीलाल उदने,श्रीपाद सुभेदार,रत्नाकर साबळे सचिन उपदेशी, कुशल चाबुकस्वार फवारणी कर्मचारी उपस्थित होतेे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा