भारतीय जनता पार्टीतर्फे चक्काजाम आंदोलन

भारतीय जनता पार्टीतर्फे चक्काजाम आंदोलन

औरंगाबाद / प्रतिनिधी : ओबीसी  समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे दुध डेअरी सिग्नल चौकात, दिनांक 15 सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
        या आंदोलनाचे नेत्रत्व आ. अतुल सावे,शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे,बस्वराज मंगरूळे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणिस सविता कुलकर्णी यांनी केले. या वेळी ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में,तसेच सोनियाचा पोपट काय म्हणतो, आरक्षण द्यायचं नाही म्हणतो,महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय,खाली मुंडके,वर पाय,आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे,जो ओबीसी हित कि  बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा या प्रकारच्या विविध घोषणा देऊन आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केले भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारच्या नाकरते पणामुळे ओबीसी समाजाची राजकिय हत्या केली व राजकिय आरक्षण घालवले त्या मुळे या माहाविकास आघाडीचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलिस व आंदोलकांची झटापट झाली, त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून, क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले. या वेळीभाऊराव देशमुख, सरचिटणिस राजु शिंदे,समिर राजुरकर,शिवाजी दांडगे,राजेश मेहता, अनिल मकरिये,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे,आणुसुचित मोर्च प्रदेश सरचिटणिस जांलिदंर शेंडगे,डॉ.राम बुधवंत,महिला मोर्चा शहर अध्यक्ष अमृता पालोदकर,मंडल आध्यक्ष सागर पाले,प्रविण कुलकर्णी,अजय शिंदे,संजय चौधरी,लक्ष्मीकांत थेटे,आरुण पालवे,शंकर माहत्रे,मनोज भारस्कर,आशोक दामले,मनिषा मुंडे,मनिषा भनसाली,प्रमोद राठोड,रामेश्वर भादवे ,दीपक ढाकणे, बालाजी मुंडे,संजय बोराडे, हाफिज शेख, जगदिश सिद्ध,अरविंद डोणगावकर,विवेक राठोड,रामचंद्र नरोटे,दौलत खान पठान,धनंजय कुलकर्णी,दिव्या मराठे,संग्राम पवार,धंनजय पालोदकर,मोहन आघाव,चंद्रकांत हिवराळे,लक्ष्मण कुलकर्णी,ज्ञानेश्वर बोरसे,बालाजी मुंडे,नितिन चिते,सागर निलकंठ,कुणाल मराठे,विजय वडमारे,साधना सुरडकर,योगेश वाणी,पुजा सोनवणे,आदि कार्यकत्यांना  पोलिसांनी अटक केली.व नंतर सोडून दिले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा