बापच निघाला हैवान पोटच्या मुलीवर बलात्कार

रक्षक जर भक्षक निघाला तर जायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईमध्ये घडली आहे. बापाने पोटच्या 13 वर्षीय मुलीचा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी ८ महिन्यांची गरदोर राहिली आहे. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनमुळे मुंबई हादरली आहे.
या प्रकरणी नराधम बापाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बापाने आपल्या १३ वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली आहे. बलात्काराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पीडित मुलीने कुणालाही सांगितले नाही. पण पोटात दुखत असल्यामुळे मुलीला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३६ वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(एफ), ६४(२) (एच), ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ३५१ (३) आणि ६९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.