हर घर दस्तक लसीकरण मोहीम
औरंगाबाद/प्रतिनिधी - मा.प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात हर घर दस्तक कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
आज पर्यंत एकूण 1,71,442 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले . दि 30 नोव्हेंबर रोजी 10277 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.यात एकही डोस न घेतलेले 2406 स्त्रिया व 1925 पुरुष लाभार्थी आढळून आले.तसेच पहिला डोस घेतलेले 13775 लाभार्थी व दुसरा डोस घेतलेले 10891 लाभार्थी आढळून आले.दुसरा डोस न घेणारे 2349 स्त्री व 2141 पुरुष लाभार्थी आढळून आले.6251 लाभार्थ्यांना लसीकरण बाबत संदर्भित करण्यात आले .यापैकी आज 3513 लाभार्थ्यांनी पहिला डोस व 1599 लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.