पाच लाख राशन दुकान धारक दिल्लीला धरणे देतील

औरंगाबाद /प्रतिनिधी - काही दिवसापूर्वीच स्वस्त धान्य दुकानदारकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले  होते. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर  आम्ही दिल्लीला  धरणे आंदोलन करू आणि त्याचाच भाग म्हणून दि. ११जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
  महिन्याच्या पाच तारखेच्या आत मशीन मध्ये डाटा वितरणासाठी उपलब्ध करून द्यावा, स्वस्त धान्य दुकानदारास शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे ऑनलाइन डाटा आधार सीडिंग दुरुस्ती करणे, कोविड मुळे निधन झालेल्या दुकानाचा परवाना त्याच्या  नावे त्वरित करण्यात यावा, शालेय पोषण आहाराची थकीत चोरी देण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये दुकानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर धरणे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा