ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या

ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या.

या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ५० जण जखमी झाले असून यातील १५-२० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. यानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावाजवळ हा अपघात झाला. बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर तीन बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या सिमेंटने भरलेल्या ट्रकचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसला धडकला. यात दोन बस उलटल्या, तर तिसऱ्या बसचा चक्काचूरा झाला. या अपघातात ५ जण ठार झाले तर ५० जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली.

अमित शहा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'सिधी (M.P.) येथील रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींवर प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. जखमी सर्वजण लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.'

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

अपघातानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. चौहान यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर चौहान यांनी रीवा येथील संजय गांधी रुग्णालयाला भेट देवून जखमींची विचारपूस केली. राज्यमंत्री रामखेलावन पटेल आणि रेवाचे खासदार जनार्दन मिश्रा हेही मुख्यमंत्र्यांसोबत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा