दुर्धर आजाराच्या रुग्णांना जिल्हा परिषद मार्फत आर्थिक मदत योजना

दुर्धर आजाराच्या रुग्णांना जिल्हा परिषद मार्फत   आर्थिक मदत योजना

औरंगाबाद/प्रतिनिधी -  दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी श्री छत्रपती शाहू महाराज आर्थिक मदत योजना या अंतर्गत हृदयरोग, किडनी निकामी होणे व कॅन्सर या तीन आजारासांठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना आर्थिक मदत दिली जाते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता म्हणून रुग्ण हा औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. कर्करोग, हृदयरोग व किडनी निकामी होणे या तीन आजारांपैकी आजार असणे, या तीन आजारासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयातील उपचार घेणे आवश्यक, सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती साक्षाकित रु.15 हजार पर्यंतच्या मर्यादीत मूळ पावत्या (उपचार खर्चाचे कागदपत्रे जोडणे आवश्यक), रुग्ण हा भूमीहीन, अल्पभूधारक, दारिद्रय रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य देण्यात येते, रुग्ण दुर्धर रोगाने पिडित असल्याबाबतचे शासनाने प्राधिकृत केलेल्या आरोग्य संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र तसेच डिस्चार्ज कार्ड असणे आवश्यक आहे, बँक पासबुक पानाची प्रत आयएफसी कोडसह योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी 15 जानेवारी  पर्यंत प्रस्ताव आरोग्य विभाग जि.प.कार्यालयास उपसंचालक आरोग्य सेवा, दुसरा मजला बाबा पेट्रोल पंपासमोर महावीर चौक, औरंगाबाद येथे सादर करावे, असे आवाहन आरोग्य व शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा