योगा दिनानिमित्त शहरात 75 ठिकाणी एकाच वेळी होणार योगा
औरंगाबाद/ प्रतिनिधी- आझादी का अमृत महोत्सव निमित्त शहरातील 75 वॉर्डात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकाच वेळी सकाळी 7 ते 8 यावेळी योगा होणार यासाठी एकुण 225 योगा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दि. १९ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मोदींनी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना एक ठिकाण ठरवुन दिले त्याठिकाणी योगा होणार यानुसार डॉ. भागवत कराड हे साबरमती येथे जाऊन योगा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्र्यंबकेश्वर ला योगा करणार आहेत. तसेच भविष्यात शहरात भव्य योगा भवन बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ. भागवत कराड यांनी दिली. दिवाळीच्या आसपास योगगुरू रामदेव बाबा यांना औरंगाबादेत बोलावून तीन दिवस योगा शिबिर घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले.