शुल्लक कारणावरून त्याचा घेतला जीव

शुल्लक कारणावरून त्याचा घेतला जीव

औरंगाबाद/प्रतिनिधी - आमच्या घराकडे तु टक लावून का पाहतो या शुल्लक कारणावरून एका तरुणाला लोखंडी गजाने मारहाण केल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद  जिल्ह्यात घडली आहे.
      गावात तरुणाला मारहाण होत असताना तरुण मारू नका अशी विनवणी करत होता तरी सुद्धा मारेकर्‍यांना कोणीही थांबवले नाही. मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गावात तरुणाला मारहाण होत असताना तरुण मारू नका अशी विनवणी करत होता तरी सुद्धा मारेकर्‍यांना कोणीही थांबवले नाही. मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ७४ जळगाव या गावात घराकडे टक लावून का पाहतो या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाला जीव गमवावा लागला. संतोष प्रकाश एरंडे असे मृत तरुणाचे नाव आहे. संतोष प्रकाश एरंडे या युवकाला शुक्रवारी सायंकाळीच्या वेळी गावातीलच रावसाहेब गटकळ, जीवन गटकळ, वैभव गटकळ या तिघांनी आमच्या घराकडे टक लावून का पाहतो म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.विशेष म्हणजे संतोषला मारहाण होतांना त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई मंदाबाई एरंडे धावत पळत मंदिराजवळ गेली. त्याला का मारता असे विचारले असता आरोपींनी त्यांनाही ढकलून दिले. आईने विनवणी केली तरीही लोखंडी गजाने मुलांच्या डोक्यावर हातपायावर, पाठीवर जबर मारहाण केले. या प्रकरणी औरंगाबाद बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपस करीत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा