नाभिक समाजाचा १६ जानेवारीला समाज प्रबोधन मेळावा
औरंगाबाद/ प्रतिनिधी - सकल नाभिक समाज, औरंगाबादच्या वतीने १६ जानेवारीला नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नाभिक समाजातील जुन्या चालीरिती व भविष्यातील संधी आणि सद्यस्थितीतील विविध त्रासदायक बाबींवर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संयोजक निलेश (बंटी) बोर्डे, सचिन गायकवाड यांनी दिली.
यावेळी अॅड. सोपानराव शेजवळ, विष्णू वखरे, प्रा. राजकुमार गाजरे, नवनाथ घोडके, रत्नाकर वरपे, सुशील बोर्डे, शशिकांत सोनवणे, दिलीप बोर्डे, अमोल बोर्डे उपस्थित होते.
जुन्या रुढीवर मात करून समाजाला काळानुरुप दिशा देण्यासाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय अस्तित्वासंदर्भात मंथन होण्याहेतू १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता श्री. संत सेना भवन, हडको, औरंगाबाद येथे नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतील. मेळाव्याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे करतील. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष अॅड. सोपानराव शेजवळ तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गाविंद दळवी प्रमुख मार्गदर्शक असतील़ मंजुषा निंबाळकर, श्रावण भातखडे, अॅड. विलास वखरे, विलास वाटकर, हरिहर पळसकर, सयाजीराव झुंझारे, साधना इंगळे प्रमुख पाहुणे असतील़ तर वसंतराव जाधव, मनोज जाधव, शिवाजी लिंगायत, विष्णू वखरे, सुशिल बोर्डे, दत्तु बापु बोर्डे, सतिश जयकर, रत्नाकर पंडित, संजय गारोल, शिवनाथ लिंगायत, माधव भाले, शंकरराव गायकवाड, नानासाहेब पंडित, शिवाजी पांडव, बाबुराव सोनवणे, राजकुमार गाजरे, तुकाराम सनईकर, ज्ञानेश्वर तारे, नवनाथ घोडके, वत्सलाबाई पुंडलिक राऊत, दिलीप बोर्डे, कचरु जाधव, वाल्मिकराव सोनवणे, अण्णासाहेब बोरुडे, रत्नाकर वरपे, प्रभाकर लिंगायत, रमेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे़ या मेळाव्यात नाभिक समाजातील दिशा, दशा आणि भविष्यातील वाटचालीवर मंथन होणार असल्याने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक निलेश बोर्डे, सचिन गायकवाड यांनी केले.
या संघटनांचा असणार सहभाग
सकल नाभिक समाजच्या वतीने आयोजित नाभिक समाज प्रबोधन मेळाव्यात समाजातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. यात यात अखिल भारतीय जीवा सेना,महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक सेवा संघ, नाभिक एकता संघ, श्री. संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ आदींचा समावेश आहे.