मानांकित शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह
औरंगाबाद /प्रतिनिधी- सरस्वती भुवन शाळेतील क्रीडा शिक्षक यांची 21 डिसेंबर रोजी आर टी पी सी आर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने आज गुरुवारी शाळेतील इतर कर्मचारी शिक्षक व विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. या अगोदरच बहुतांश शाळेतील कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली होती,इयत्ता 5 वी ते 7 वी पर्यंत एकूण 864 विद्यार्थी संख्या असून यात 23 शिक्षक शिक्षिका यांचा समावेश आहे.
पोजिटिव्ह शिक्षकामध्ये आजाराची सौम्य लक्षणे असून, स्वाब सँपल साठी रवाना केले आहे. सदर शिक्षक सध्या एका खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निगराणीत होम क्वारंटाईनआहेत.अशी माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली.