असा बनला क्रांती चौकातील महाराजांचा नवीन पुतळा

असा बनला क्रांती चौकातील महाराजांचा नवीन पुतळा

औरंगाबाद / प्रतिनिधी - क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवजयंती दिनी म्हणजे १९ फेब्रुवारीला अनावरण होणार आहे़  त्यानिमित्ताने क्रांतीचौकातील पुतळ्याची उंची वाढवण्यापासून तो पुतळा कसा बनला त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे़.
  पुतळ्याची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यानी २९ जून २०१९ रोजी मान्यता दिली़ पुतळ्याच्या चौथऱ्याचे कंत्राट गायत्री आर्किटेक्टसचे प्रो. पो. व्यंकटेशराव यांना देण्यात आले होते.  पुतळ्याचे शिल्पकार पूण्याचे प्रो. दिपक थोपटे हे असून वास्तूविशारद औरंगाबादचे धीरज देशमुख हे आहेत.

पुतळ्याची वैशिष्ट्ये

देशातील शीवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून मान मिळवणाऱ्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची २१ फुट आहे़. पुतळ्याचे वजन ७ मेट्रीक टन असून पुतळा ब्राँझ धातूने बनवलेला आहे़. पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची ३१ फुट असून चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फुट आहे़ चौथऱ्याचे बांधकाम आर.
सी. सी. मध्ये असुन चौथऱ्याभोवती स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे़ २४ कमानीत २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत़ चौथऱ्याभोवती कारंजे तयार करण्यात आलेले असून हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे़ महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करायला ९८ लाख, चौथऱ्याच्या बांधकामास २५५ लाख असे एकूण ३५३ लक्ष रूपये खर्च आला आहे़.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा