भव्य "ग्रामसेवक भवन" बांधणार -रमेश मुळे
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जुनी इमारत पाडून नवीन 4 मजली भव्य इमारतीचे बांधकाम करणार असे जाहीर केले.
औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था यांची पहिली सर्वसाधारण चेअरमन रमेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या सभेत,जुनी इमारत पाडून नवीन 4 मजली इमारतीचे बांधकाम करणे, संस्थेच्या नवीन प्लॉट वर शॉपिंग कॉम्प्लेक्स,1000 आसन क्षमतेचे भव्य सभागृह, कार्यालय, विश्रामगृह, अभ्यासिका, ग्रामसेवक भवन ई.जमा असलेल्या रिझर्व फंड मधून 50%रक्कम १.८० कोटी खर्च करण्यास मान्यता दिली.
या सभेत नवीन सभासद नोंदणी करणे, मागणी प्रमाणे कर्ज मंजूर करणे व्याजदर कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेस मागणी करणे, इयत्ता १२ वी नंतर सभासदांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आकर्षक व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे, भाग भांडवल व ठेवी मध्ये वाढ करणे, संस्थेमार्फत आरडी सुरू करणे, प्रत्येक सभासदांसाठी वैद्यकीय अपघाती नेसर्गिक विमा,पतसंस्था आय एस ओ नामांकन मिळणे, इत्यादी महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष मरमट,सचिव सागर, डोईफोडे कोषाध्यक्ष, कल्पना गोखले,संचालक मंडळ -सुनील राकडे,रामकृष्ण निकम,गणेश धनवई,अशोक काळे,जनार्दन शिंदे, अजय ठाकरे, अरुण चव्हाण,हारुण तडवी,नितीन निवारे,अवचित राऊतराय, छायाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.