प्रस्ताव पाठवा मी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

प्रस्ताव पाठवा मी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

औरंगाबाद/ प्रतिनिधी -  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  भागवत कराड यांनी  शनिवारी औरंगाबाद स्मार्टसिटी च्या सल्लागार समितीच्या बैठकीत मनपा आयुक्त व स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय  यांच्या कामांचे कौतुक केले. त्यांनी आश्वासन दिले की शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यांनी औरंगाबाद स्मार्टसिटी ला महत्वपूर्ण प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.

औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहर सल्लागार समितीची बैठक शनिवारी घेण्यात आली. या वेळेस खा.  इम्तियाज जलील, आमदार  अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ स्मार्ट सिटी चे संचालक भास्कर मुंडे, सल्लागार समितीचे सदस्य पियूष सिंह, मुनिष शर्मा, नताशा झरीन यांच्यासोबत स्मार्टसिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, अतिरीक्त आयुक्त बी बी नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व स्मार्टसिटी चे अधिकारी ही उपस्थित होते.

बैठकीत शिंदे यांनी स्मार्टसिटी च्या विविध प्रकल्पांवर सादरीकरण केले. त्यांनी सांगितलं की पूर्ण झालेले प्रकल्पात स्मार्ट बस, मास्टर सिस्टीम इंटेग्रेटर, 150 बस थांबे, मनपा मुख्यालय वर बसवलेले सौर् ऊर्जा प्रकल्प, कोविड-१९ व्यवस्थापन, पायलट सायकल ट्रॅक व पादचारी मार्ग, ऐतिहासिक दरवाज्याचे व शहागंज घड्याळाचे संवर्धन, लव युअर सिटी ग्लो साइन आणि स्वीपिंग मशीन ह्यांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पात सफारी पार्क, स्मार्ट सिटी मुख्यालय व ऑपरेशन कमांड सेंटर, संत एकनाथ रंगमंदिर चा स्टेज चा काम, जी आय एस सर्व्हे, ई गव्हर्नन्स, मौलाना आझाद संशोधन केंद्राची दुरुस्ती, मुकुंदवाडी बसडेपो, सुपरहिरो पार्क आणि क्रांती चौक फ्लायओव्हर च्या खाली शिवसृष्टी बनवण्याचे काम सामील आहेत.
<span;>नवीन ऑपरेशन कमांड सेंटरवर 150 केव्ही चा सौर ऊर्जा प्रकल्प आता निविदा प्रक्रियेत आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून  याद्वारे वीज बील ही वाचेल. याव्यतिरिक्त 13 प्रस्तावित प्रकल्प आहेत. स्ट्रीटस् फॉर पीपल, लाईट हाऊस कौशल्य विकास प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे नविनिकरण, संत तुकाराम नाट्यगृहाची दुरुस्ती, वॉटर मीटर, सलीम अली सरोवराचे संवर्धन, ई व्हेकल्सची ची खरेदी, स्मार्ट सिग्नल, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, सफारी पार्क चे आधुनिकीकरण आणि ऐतिहासिक दरवाज्याची रोषणाई या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.

यावेळेस प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले की केंद्र शासनाचा वाहतूक विभाग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्याच्या हेतूने शहरांना बसेस खरेदी करण्यासाठी   सहाय्य करणार आहे. तर शहराला अजून 100 बसेस मिळावे यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणे गरजेचे आहे. स्मार्टसिटी मिशन तर्फे औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रोजेक्ट ला पूर्वी प्राप्त मान्यतेनुसार 1000 कोटी रुपये मिळणार आहे ज्याचात 500 कोटी  केंद्र शासन, 250 कोटी राज्य शासन व 250 कोटी मनपा ने टाकायचे आहेत. "मनपा आपला वाटा टाकण्यासाठी तयार आहे. आणि जेवढ्या लवकर निधी चा वापर होणार तेवढ्या लवकर पुढची निधी प्राप्त होईल,"  प्राप्त पत्रानुसार स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जून 2023 पर्यंत सुरू होणार आहे असेही त्यांनी सांगितले

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी"शहरासोबत जिल्हा व मराठवाडा सुधारणे, हे माझं ध्येय आहे. सर्व मोठ्या बँकेच्या चेअरमन ची एक बैठक या महिन्यात शहरात बोलवली असून  याद्वारे मी राष्ट्रीय बँकट्रेनिंग संस्था इथे आनण्याचा प्रयत्न करतो आहे.  माझ्या अधिकारात येणारे पिएसयू, बँकिंग व फायनान्स कंपनीचे सी एस आर औरंगाबाद ला आनण्याचे माझे प्रयत्न आहेत. पण याचसाठी मला मनपा व स्मार्ट सिटी कडून महत्वपूर्ण प्रकल्पासाठी प्रस्ताव ची अपेक्षा आहे," कराड म्हणाले औरंगाबाद च्या विकासासाठी मी निधी कमी पडू देणार.

बैठकीनंतर सर्व मान्यवरांना स्मार्ट सिटी तर्फे नवीन तयार होत असलेली ऑपरेशन कमांड सेंटर ची बिल्डिंग दाखविण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी चे राम पवणीकर, अनिल कोथळीकर, इमरान खान, स्नेहा नायर, स्नेहा बक्षी, आदित्य तिवारी, अर्पिता शरद, ऋषिकेश इंगळे, किरण आढे, प्रतीक मानवतकर, सिद्रार्थ बनसोड आणि विष्णु लोखंडे उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा