वाहतुकीचे दंड भरणे आता गरजेचे
औरंगाबाद/प्रतिनिधी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारक व चालक यांनी 10 डिसेंबर पर्यंत दंड न भरल्यास त्यांना लोक अदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
सिटबेल्ट न वापरणे, रॉंग साईड ने वाहन चालविने, हेल्मेट न वापरणे, ट्रिपलसिट इत्यादी प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ई-प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येते.तसा मेसेज संबंधिताच्या मोबाईलवर येतो. व १५ दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरणा करावी अशी सूचना त्या मेसेजमध्ये नमूद केलेली असते तरी देखील अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरत नाहीत. ज्या वाहन चालकांवर दंड आहे.परंतु त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही.त्यांच्यासाठी १० डिसेंबर पर्यन्त दंड भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तशी नोटीस दंड थकीत असलेल्या वाहनधारकांना एस.एम.एस.द्वारे पाठविण्यात आल्या आहेत. जे वाहनधारक दंड भरणार नाही.त्यांना ११ डिसेंबर रोजी सकाळी १०वा. जिल्हा व सत्र न्यायालय येथे लोकअदालतमध्ये हजर राहावे लागणार आहे
या ठिकाणी भरू शकता दंडाची रक्कम.
- रोख स्वरूपात भरावयाची असल्यास वाहतूक शाखेच्या पाचही कार्यालयात किंवा विविध मार्गावर ,पॉइंटवर उभे वाहतूक अधिकारी,कर्मचारी यांच्या कडे.
- डेबिटकार्ड किंवा क्रेडिटकार्ड स्वरूपात.
चलनाचे आलेल्या एस.एम.एस.मधील लिंकद्वारे
- महा ट्राफिक अँपद्वारे.
-mahatrafficechallan.gov.in या वेब साईट द्वारे
महिन्याकाठी ३० हजार वाहन चालकांवर कारवाई- सुरेश वानखेडे (साह्ययक आयुक्त, वाहतूक शाखा)
<span;>औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर रोज सरासरी एक हजार कारवाई वाहतूक विभागाकडून करण्यात येते.तर महिन्याकाठी ३०ते ३२ हजार वाहनचालकांवर कारवाई होत असते. या मधून अनेकजण दंडाची रक्कम भरत नाही. ज्यांची दंडाची रक्कम भरणा करणे बाकी असेल त्यांनी ती त्वरित भरणा करावी.तश्या नोटीस संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.