32 प्रवाशी झोपेतच असताना धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट पुढे काय झाले पहा व्हिडिओ

औरंगाबाद / प्रतिनिधी : जिल्ह्यातील अजिंठा येथे पुण्याहून मलकापूरला जाणारी श्री राम साई ट्रॅव्हल्स क्रमांक MH(12 EQ 9007) ला सकाळी साडे पाच वाजता अचानक आग लागली. ही घटना अजिंठा येथे भारत दर्शन जवळ घडली. पाठीमाचे ब्रेक लाइनर पकडल्याने चाका पासून आग लागल्याने साई राम ही ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात प्रवास करणारे 32 जण सुरक्षित आहेत. यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही.  

या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण, शेळके, संजय बाम्हणदे, संजय कोळी व होमगार्ड मंत्री आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. आणि प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले व ट्रॅफिक सुरळीत केली.

या घटनेचा पंचनामा करून अजिंठा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा