मंकीपॉक्स व्हायरस वर औषध सापडलं

मंकीपॉक्स व्हायरस वर औषध सापडलं

अँटिव्हायरल औषधे मंकीपॉक्स  रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात.

अमेरिका आणि युरोप सह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहेत. या आजारात अँटिव्हायरल औषधे आराम देऊ शकतात असं लँसेटच्या अभ्यासातून समोर  आल आहे.
लँसेट जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट ब्रिटन येथे करण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे हे संशोधन 2018 चे 2021 दरम्यान युनायटेड किंगडम मधील मंकीपॉक्सचा सात रुग्णांवर करण्यात आले. रुग्णांपैकी तीन रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून आलेले होते आणि उर्वरित चार रुग्णांमध्ये संसर्ग एकातून दुसरा मध्ये पसरला होता.
रुग्णांवर दोन औषधांचा वापर करण्यात आला औषध btincidofovir आणि tecovirimat ही आहेत. पहिल्या औषधाचा वापर करूनही रुग्णांना फारसा फायदा झाला नाही हे औषध तीन रुग्णांवर वापरले गेले औषध घेतल्यानंतर या रुग्णांच्या लिव्हरच्या ची पातळीही  थोडीशी खालावली. तरी सर्व रुग्ण काही वेळाने बरे झाले. 2021 मध्ये युनायटेड किंगडम रुग्णांमध्ये दुसरे औषध वापरले गेले. हा रुग्ण लवकर बरा झाला आणि दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका कमी झाला. संशोधकांना असे आढळून आले आहे की मंकीपॉक्स वायरस रक्तात आणि लाळेमध्ये  देखील आढळतो. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की याआधी मंकीपॉक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पसरला नव्हता पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. याशिवाय कमी लोकांवर केलेल्या अभ्यासामुळे संशोधकांनी कोणतेही अँटिव्हायरल औषध वापरतात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक एडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार महामारीच्या या नवीन उद्रेकाने  ब्रिटनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रुग्ण प्रभावित केले आहेत. तर मंकीपॉक्स पूर्वी लोकांमध्ये वेगाने पसरत नव्हता त्यामुळे एकूण सध्या धोका कमी आहे. सध्या मंकीपॉक्स कोणताही अधिकृत उपचार नाही आणि त्याच्या संसर्गाच्या कालावधी ची माहिती देखील मर्यादित आहे तर  संसर्गाचा प्रसार 5 ते 21 दिवसांपर्यंत असतो.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा