वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचे नामकरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते

वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचे नामकरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते

औरंगाबाद /प्रतिनिधी-  सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पांच मादी बछड्यांचे नामकरण आज दि 21 सप्टेंबर रोजीखासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चिट्ठी काढून करण्यात आले.
सदरील पांच बछड्यांचे नाव सुचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देऊन किमान 200 नागरिकांकडून नावे सुचविण्यात आले होते.
सोडत  नुसार 1) जिजाई (सूचक: रामदास बोराडेे)2) प्रतिभा (सूचक विठ्ठलराव देवकर)3)वैशाली (सूचक: अथर्व चाबुकस्वार)4) रंजना (सूचक; कुसुम दिवाकर)5) रोहिणी (सूचक: पूर्वा पाटील) ही नावे देण्यात आली.

यावेळी वाघांचे केयर टेकर मोहम्मद जिया आणि एसबीआय बँक यांनी वाघ दत्तक घेतल्या बद्दल पवार यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी  समृद्धी वाघिणीच्या बछड्यानां नाव देण्याची अतिशय गोड संधी दिल्याबद्दल  महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांचे आभार व्यक्त केले आणि पांडेय यांच्या कामाचे मुक्त कंठाने कौतुक केले.
ज्या पद्ध्तीने आणि गतीने पांडेय औरंगाबाद शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे आणि विकास कामे पूर्ण करत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करते. ते अतिशय चांगले काम करत आहे, असे त्या म्हणाल्या.
वाघ हा माझा आवडता प्राणी असून मी दरवर्षी वाघ बघण्यास ताडोबाला जात असते. पण आज जी गोड संधी मला मिळाली ही आयुष्यात एकदाच मिळते, या कार्यक्रमाची मला सदैव आठवण राहतील आणि मला ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आयुक्त पांडे यांचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय,पोलीस अधीक्षक(लोहमार्ग) मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, शहर अभियंता एस डी पानझडे, उप आयुक्त सौरभ जोशी, प्रभारी प्राणी संग्रहालय संचालक डॉ शेख शाहेद,सेवानिवृत्त संचालक डॉ बी एस नाईकवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ नितिसिंह चव्हाण, एसबीआय उप प्रबंधक दत्ता प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा