रेड्डी कंपनी कर्मचाऱ्यांच आंदोलन स्थगित
औरंगाबाद / प्रतिनिधी - रेड्डी कंपनीच्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांनी किमान वेतनवाढ द्यावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले होते आमदार अंबादास दानवे यांच्या मध्यस्थीने तूर्तास मागे घेण्यात आले आहे.
औरंगाबाद महानगरपालिका प्रशासने शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक करण्यासाठी हैदराबाद येथील पी गोपीनाथ रेड्डी यांना ठेका दिला आहे. गेल्या 3 वर्षा पासून मनपाच्या झोन क्र. 9 मध्ये 1 हजार 70 कर्मचारी 8 ते 9 हजार वेतन वर काम करत आसून यांना आज पर्यंत पगार वाढ झाली नाही.
या कमी वेतनात कर्मचाऱ्यांचे हाल होत असून मागणी करून सुद्धा वेतनवाढ देत नसल्याने आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कामगार शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली रेड्डी कंपनीच्या कामगारांनी सामूहिक रजा घेत 3 दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेतला .यामुळे संपूर्ण शहरात कचरा संकलन व वाहतूक बंद राहिल्याने बहुतांश भागात कचऱ्याचे ढीग दिसून आले.
अवघ्या काही दिवसात शिवजयंती आसल्याने आमदार अंबादास दानवे यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्ते कर्मचारी व मनपा प्रशासन आणि रेड्डी कंपनी चे मालक यांनी त्वरित बैठक घेउन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत तूर्तास 21 फेब्रुवारी रोजी पर्यंत वेळ मागीतला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असून यासाठी आपण स्वतः पुढाकार घेउन न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आमदार दानवे यांनी कर्मचाऱ्यांना दिले.