वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकांनी घेतला मोकळा श्वास

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकांनी घेतला मोकळा श्वास

वाळूज / प्रतिनिधी - वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौका चौकात चहाची दुकाने, पंक्चर काढणाऱ्यांनी तसेच टपरीचालकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. ही अतिक्रमणे गुरूवारी दि. १६ एमआयडीसी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढली. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकांनी मोकळा श्वास घेतल्याने उद्योजक, कामगार व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.

वाळूज औद्योगिक परिसरातील मुख्य चौका चौकात  तसेच रस्त्याच्याकडेला विविध व्यवसायिकांनी टपºया, हातगाड्यावर तर काही व्यवसायकांनी पक्के बांधकाम करून दुकाने थाटली होती. या अनाधिकृत टपऱ्या व हातगाड्यावरील खरेदीदारांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत होती. औद्योगिक क्षेत्रात झालेल्या या अनाधिकृत अतिक्रमणामुळे उद्योजक, कामगार तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने उद्योजक व वाहनधारक त्रस्त झाले होते. या वाढत्या अतिक्रमणामुळे छोटे मोठे अपघाताचे प्रमाण वाढले होते. ही अनाधिकृत दुकाने टपरीधारकाविरूध्द  एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस.ए.दराडे, अधिक्षक अभियंता आर.व्ही.गिरी, कार्यकारी अभियंता आर.डी.गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश मुळीकर, अरुण पवार, बी.एस.दीपके आदींनी गुरुवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केली होती. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, वाहतुक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके यांनीही या अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभाग घेऊन पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या पथकाने जोगेश्वरी ते तिरंगा चौक, कामगार चौक, एफडीसी चौक, एनआरबी चौक, रांजणगाव फाटा आदी ठिकाणावरील पानटप्या व हातगाड्याचे अतिक्रमणे काढली. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यापुर्वी एमआयडीसी प्रशासन व स्थानिक पोलिस प्रशासनाच्यावतीने ध्वनीक्षेपकावरुन जनजागृती करुन अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने चार पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकाने पोलिस बंदोबस्तात मुख्य चौक व रस्त्त्याला लागुन असलेली अतिक्रमणे तीन जेसीबीच्या सहाय्या हटविली. यावेळी १० ट्रॅक्टरमधुन जमा झालेले साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरुच राहणार असून यानंतर पुन्हा अतिक्रमणे करणाºया व्यवसायिकाविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा इशाराही अतिक्रमणधारकांना देण्यात आला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा