शिऊर बंगला ते तलवाडा रस्त्याच्या कामासाठी महिला उपसभापतीचे उपोषण सुरू
औरंगाबाद/प्रतिनिधी
कन्नड घाटातील काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक कसाबखेडा शिऊर बंगला मार्गे नांदगाव वळविण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज २७ शनिवार पासून वैजापुर तालुक्याच्या उपसभापती योगिता आनंद निकम यांनी शिऊर बंगला येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
बंगला ते तलवाडा रस्त्यावर जवळपास साडेपाचशे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांचा ताशी वेग दहा किलोमीटर झाला आहे असे असताना या रस्त्यावर राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू आहे हे अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकांना आली आहे त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे ही समस्या दूर करण्यासाठी दहा दिवसापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी उपसभापती योगिता निकम यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती मात्र या निवेदना कडे दुर्लक्ष करून अधिकाºयांनी चालढकल केली त्यामुळेच उपसभापती निकम यांनी आज उपोषणाचा मार्ग निवडला आहे हे उपोषण काम सुरू होईपर्यंत सुरू राहील असा निर्णय घेतला आहे.
या उपोषणाला परिसरातील सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी पाठिंबा दर्शविला असून पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य तथा सोसायटीचे सदस्य आजी माजी पदाधिकारी शिवसेना-भाजपा काँग्रेस-राष्ट्रवादी दलित संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे
अधिकाºयांची धाव
सदरील रस्त्याचे काम करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका महिनाभरात नवीन वर्क आॅर्डर दिल्या जाईल अशी माहिती उप अभियंता काकड यांनी दिली मात्र तूर्तास खड्डे बुजविण्याची तरतूद करू असे थातूरमातूर उत्तर त्यांनी दिले.