रेस टू रेझिलिअन्स चा भाग बनणार औरंगाबाद शहर
औरंगाबाद / प्रतिनिधी - 25 ऑक्टोबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेतील सिटी रेस टू रेझिलिअन्सचा भाग बनणारे औरंगाबाद हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. तीव्र उष्णता, दुष्काळ, पूर आणि समुद्र पातळी वाढ यासारख्या बदलांमुळे होणाऱ्या शहरी हवामानाच्या प्रभावांना प्रतिरोधक बनवणे, या एकमेव उद्देशाने ही मोहीम तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत या आपत्तींमध्ये आघाडीवर असणाऱ्या समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, ज्यामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत होईल.
हवामान बदलाचा प्रभावाला कमी करण्याचा दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी औरंगाबाद ने महाराष्ट्रातून संयुक्त राष्ट्र संघाच्या रेस टू रेसिलिएन्स मोहिमेत सहभाग जाहीर केला आहे.
औरंगाबाद हा अवर्षणप्रवण, पावसावर अवलंबून असलेला, दुष्काळ प्रभावित प्रदेश आहे. त्यामुळे हवामान बदलाचा सर्वाधिक धोका शहराला आहे. याचे उदाहरण म्हणजे जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये अत्यंत मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा सामना करावा लागला. औरंगाबाद हे एक विकसनशील शहर असल्याने शाश्वत भविष्यातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे. औरंगाबाद शहराच्या याच वचनबद्धतेमुळे 25 ऑक्टोबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेतील सिटी रेस टू रेझिलिअन्सचा भाग बनणारे हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे.
रेस टू रेझिलिन्स ही अशीच एक प्रतिज्ञा आहे जी शहरासाठी हवामान बदलाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी आणि रेस टू रेझिलिन्स अंतर्गत भागीदारीद्वारे लवचिकता निर्माण करण्यासाठी एक पायरी ठरेल. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे COP26 मधील जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत घोषित केल्यानुसार 2070 च्या निव्वळ-शून्य लक्ष्याच्या मोठ्या राष्ट्रीय दृष्टीकोनासाठी हे शहर-स्तरीय उपक्रम महत्त्वपूर्ण भाग बनतील आणि भारतातील नागरिकांना तसेच औरंगाबादला शाश्वत जीवनाची संधी मिळेल.
औरंगाबाद मध्ये सध्या सुरू असणारे उपक्रम:
औरंगाबाद स्मार्ट सिटी सह औरंगाबाद महानगरपालिकेने याआधीच हवामान आपत्कालीन परिस्थितीं विरूद्ध शहरामध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. या नागरिक-सहाय्यित चळवळीत हरित आच्छादन वाढवणे, नाल्यांची सफाई, खाम नदीचा जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवन यांचा समावेश होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 मध्ये शहरात झालेल्या संततधार पावसाचा प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय महत्त्वपूर्ण ठरले. अशाप्रकारे, केवळ 4 तासांत 90 मिमी पाऊस पडल्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही नदीकाठच्या भागात पूर आला नाही किंवा नुकसान झाले नाही. शहरात करण्यात आलेले हे उपाय लवचिकता नियोजनाची प्रेरणादायी प्रकरणे असल्याचे सिद्ध झाले आहे. जे भविष्यातील उपक्रमांसाठी मॉडेल म्हणून काम करू शकतात.