२० मजली इमारतीला भीषण आग
मुंबई /प्रतिनिधी - मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या 20 मजली इमारतीला भिषण आग लागली.
ही रहिवाशी इमारत असून 20 मजली इमारत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही आग लागली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आगीचे लोळ इमारतीच्या बाहेर स्पष्टपणे दिसत आहेत तसेच धूर ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. इमारतीतील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. इमारतीमध्ये आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाल्या आहेत.